आर्थिक शिस्त आणि लोकहिताच्या योजनांना प्राधान्य
तुमसर : राज्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या अर्थसंकल्पात अनावश्यक खर्चांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. आवश्यक आणि लोकहिताच्या योजनांना भरघोस तरतूद देत सरकारने भविष्यकालीन आर्थिक शिस्तीचा आदर्श घालून दिला आहे.
इंजि. राजेंद्र पटले यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक करताना सांगितले की, “हा अर्थसंकल्प सध्याच्या परिस्थितीस अनुकूल असून, प्रत्येक मुद्द्याचा सखोल अभ्यास करूनच तो सादर करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचे भान ठेवून योग्य नियोजन करण्यात आले आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, अर्थसंकल्पातील तरतुदी अत्यंत योग्य आणि दूरदृष्टीपूर्ण आहेत. भविष्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी फेरो युनिव्हर्सल प्रकल्प (तुमसर) आणि BHEL प्रकल्प (साकोली) लवकर सुरू होतील अशी अपेक्षा आहे.

