होळीच्या रंगांनी होणारे संभाव्य दुष्परिणाम – जनजागृती कार्यक्रम

0
208

राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

गोंदिया, दि. १० मार्च – होळी हा सण रंगांचा असला तरी त्यात वापरले जाणारे रासायनिक रंग आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय, गोंदिया येथील बी.एस.डब्लू. (BSW) प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुडवा येथे “होळीच्या रंगांनी होणारे संभाव्य दुष्परिणाम” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रा. आनंदकुमार पटले  व बिष्णू चौधरी उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. एन. फरकुंडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक शिक्षक  बी. वाय. फुले, कु. एस. पी. दास, कु. डी. आर. भेंडारकर, सौ. जे. टी. बिसेन, कु. पी. आर. पतेह, कु. जे. बी. फड मॅडम यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना रंगांचे दुष्परिणाम समजावले

प्रा. आनंदकुमार पटले यांनी रासायनिक रंगांमुळे होणारे त्वचेचे विकार, डोळ्यांना होणारा त्रास, श्वसनाच्या समस्या, केसगळती इत्यादी दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. पौर्णिमा पारधी हिने केले, तर कु. अंजली पारधी हिने आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जितेंद्र सयाम, सचिन टेकाम, रोहित राऊत, पल्लवी दाणी, पायल खांडवाये, उन्नती काठेवार, करीना मेळे, पायल बघेले, अश्विनी रहांगडाले, अर्पिता धुर्वे, अश्विनी उईके, माणशी बघेले, निकिता चाकाटे, जयश्री कल्लो, पौर्णिमा मानकर, प्रणाली मलगाम, गौरी भैरम, अलिशा डोंगरे, आचल भोयर, चैताली मडावी, कावेरी ठाकरे, यामिनी बिसेन, कैलास विठुले यांनी विशेष परिश्रम घेतले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. होळी खेळताना काळजी घेण्याचे आणि सुरक्षित रंगांचा वापर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

Previous articleसत्ता के प्रति जनभावनाओं का ख्याल रखने वाला बजट या जनता के साथ धोखा?
Next articleसमाजसेवेचा संदेश ! नीलकमल स्मृती फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम