समाजसेवेचा संदेश ! नीलकमल स्मृती फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

0
79

सडक अर्जुनी: येथील नीलकमल स्मृती फाउंडेशनच्या वतीने नीलकमल स्मृती प्रित्यर्थ सोमवारी (ता.१०) स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून समाजसेवेचा संदेश दिला. आयोजक आर. व्ही. मेश्राम आणि आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर मेश्राम, आरोग्य परिचारिका पौर्णिमा वासनिक, अश्विनी थोरात, योगिता मेंढे, आरोग्य सेविका करुणा हुमणे, तसेच दत्ता कोकरे, धरमदास बटवडे आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

या उपक्रमातून समाजात सेवा भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुग्णांना फळ वाटप करताना आरोग्य परिचारिका पौर्णिमा वासनिक, आर. व्ही. मेश्राम आणि इतर सहभागी होते.