गोंदिया ; महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटना (गट-क), मुंबई यांचे आव्हानानुसार कोषागार कार्यालय, गोंदिया येथील कर्मचारी हे शासन स्तरावर प्रलंबित विविध मागण्यांसाठी 25 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार असल्याबातचे निवेदन मा. कोषागार अधिकारी, गोंदिया यांना कोषागार संघटनेकडून देण्यात आले आहे.
कोषागार संघटनेच्या पुढीलप्रमाणे मागण्या ह्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. लेखा लिपीक (लिपीक टंकलेखक) ते कनिष्ठ लेखापाल यांचे पदोन्नतीचे प्रमाण बदलविणे, गुणवत्तेच्या आधारावर पदोन्नती मिळणे, कोषागारातील काम हे 100% वित्त व लेखा विषयक तांत्रिक स्वरूपाचे असल्याने गट-क संवर्गातील लेखा लिपीक, कनिष्ठ लेखापाल व वरिष्ठ लेखापाल यांचे वेतन त्रुटींचे निवारण करून वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करणे, लेखा व कोषागारे विभागासाठी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा परिक्षा भाग-1 व भाग-2 पुर्ववत सुरू करणे, लिपीक टंकलेखक यांचे कामाच्या स्वरूपानुसार पदनामात बदल करणे, विभागीय स्तरावर प्रलंबित पदोन्नती करण्यात याव्यात, तसेच कोषागारातील विविध संगणकीय प्रणालीतील अधिकारी व कर्मचारी यांचे Login च्या वापराबाबत शासन स्तरावरून अधिकृत कार्यपद्धती व जबाबदारी निश्चित करण्यात यावी. अशा एकुण 7 मुख्य मागण्यांसाठी कोषागार कर्मचारी हे 25 मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याच्या निर्धारावर ठाम आहेत.

