महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे राहुल दुबाले यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी!
देवरी: मागील अनेक वर्षांपासून पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व त्यांच्या हक्कांसाठी लढा देणारी एकमेव संघटना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.
डी.जी. लोन यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लागण्यास दुबाले यांच्या लढ्यामुळे यश मिळाले आहे. विधिमंडळात पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांचे लहान-मोठे प्रश्न नेहमी पोटतिडकीने मांडण्यासाठी विधान परिषदेवर पोलिसांचा हक्काचा एक सदस्य असणे आवश्यक आहे. यासाठी राहुल भैया दुबाले यांना संधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष आरती जांगडे यांनी केली आहे.
या संदर्भात आज दिनांक 12 मार्च रोजी, उपविभागीय अधिकारी माननीय कविता गायकवाड यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मी मेश्राम, तालुका उपाध्यक्ष सविता गिरी, सीमा मळावी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

