छत्रपती संभाजी महाराज नगरातील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी

0
459
1

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा सरकारला इशारा – कारसेवा करून कबर हटविण्याचा संकल्प

आमगाव, 17 मार्च छत्रपती संभाजी महाराज नगरातील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार, आमगाव मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात औरंगजेब हा क्रूर आक्रमक असून, त्याने हिंदू धर्मावर अमानुष अत्याचार केले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

संघटनांच्या मते, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची अमानुष हत्या केली. तसेच, गुरू तेगबहादूर आणि त्यांच्या मुलांचे निर्घृण हत्याकांड घडवले. काशी विश्वेश्वर मंदिर, सोमनाथ मंदिर आणि मथुरेतील अनेक मंदिरांचा विध्वंस केला. हिंदू धर्मियांचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. त्यामुळे, अशा क्रूरकर्मा आक्रमकाच्या कबरीचे अस्तित्व स्वतंत्र भारतात असू नये, असे मत निवेदनात मांडण्यात आले आहे.

संघटनांनी सरकारला विनंती केली आहे की, औरंगजेबाची कबर त्वरित हटवावी. सरकारने जर हे पाऊल उचलले नाही, तर हिंदू समाज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज नगर येथे ‘कारसेवा’ करत कबर नष्ट करण्यासाठी पुढाकार घेईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार आणि कायदेशीर प्रक्रिया कशी राबवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या वेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हिंदू समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये – बालाराम व्यास (विहिप गौरक्षा प्रमुख),नरेंद्र वाजपेयी,सुभाष आकरे,पिंटू अग्रवाल,यशवंत मानकर,पंकज पारधी,कैलाश तिवारी,खुमेश कटरे,राजू बावनथडे,गणेश गुप्ता,जागेश रिनाईत, श्याम साहू,मनीष बहेकार,जग्गू ढोमने,रोशन बोडने,समीर मानकर, गौरव पवार वरील सर्व प्रतिनिधींनी तहसीलदार यांना भेटून निवेदन सादर केले. 

 

 

Previous articleमधुमेह जागरूकता का ऐतिहासिक पड़ाव: 25 वर्ष पूर्ण
Next articleनव्या युगातील पोलिसी सेवा – गोंदिया पोलीस दलाची डिजिटल क्रांती