खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांचा पक्षप्रवेश
माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा पार पडला
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून गोरेगाव तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी पक्षात प्रवेश केला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना पक्षप्रवेश देण्यात आला.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य योगेश्वर रुपचंद चौधरी, युवा उद्योगपती अमन चिंतामण चौधरी, तसेच आर. टी. ई. फाउंडेशनचे आर. डी. कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा परिधान करून पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला.
याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये राजेंद्र जैन, केवलभाऊ बघेले, कृष्णकुमार बिसेन, नानू मुदलियार, विशाल शेंडे, खुशाल कटरे, मनीष धमगाये, अनिता तुरकर, ललिता पुंडे रामभाऊ हरिनखेड़े रामेश्वर हरिणखेडे, घनेश्वर तिराले, बाबा बोपचे, सोमेश्वर रहांगडाले, सुरेंद्र रहांगडाले,चौकलाल येडे, पी.के.कटरे,शाम फाये आदींचा समावेश होता.
या पक्षप्रवेशामुळे गोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

