तिरोडा : पंचायत समिती अंतर्गत जनसुविधा योजनेच्या माध्यमातून परसवाडा येथे सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
जिल्हा परिषद सदस्य चतुर्भुज बिसेन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि सद्याचे सदस्य हुपराज जमईवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच उषा बोपचे, उपसरपंच मणिराम हिंगे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार केला जाणार असून, पाच लाख रुपये परसवाडा कुटी रस्त्यासाठी आणि पाच लाख रुपये स्मशानभूमी रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. जनसुविधा योजनेअंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचे आभार मानले. या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

