जिल्हा वार्षिक योजनेतर्गत 100 लाभार्थ्यांना मिळाला लाभ
आमगाव, 20 मार्च 2025: पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, आमगाव यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एक दिवसीय कुक्कुट पक्ष्यांचे वाटप करण्यात आले. सभापती मा. श्रीमती योगिता ताई पुंड यांच्या हस्ते हा वाटप सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शैलेन्द्र बी. पटेल (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन), डॉ. विनोद कोटांगले (पशुधन विकास अधिकारी), डॉ. शील इलमकर (विस्तार अधिकारी), डॉ. प्रेणाल बडवाईक, डॉ. अजिंक्य उरकुडे, बिसेन,चवरे, गोदुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात 100 लाभार्थ्यांना कुक्कुट पक्ष्यांची वाटणी करण्यात आली. तसेच लाभार्थ्यांना कुक्कुट पालनासाठी आवश्यक औषधांचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. प्रेणाल बडवाईक आणि डॉ. अजिंक्य उरकुडे यांनी लाभार्थ्यांना कुक्कुट व्यवस्थापन व औषधोपचार याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी, योग्य आहार आणि संसर्गजन्य रोगांपासून बचाव याविषयी माहिती दिली.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना स्वरोजगाराची संधी मिळणार आहे. कुक्कुट पालनाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.या उपक्रमासाठी लाभार्थ्यांनी पंचायत समिती व पशुसंवर्धन विभागाचे आभार मानले.

