विकासकामांचा आढावा व जनसंवादासह प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर भर
गोंदिया, दि. २० मार्च २०२५ : खा. प्रफुल पटेल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे २२ मार्चपासून दोन दिवसीय दौऱ्यावर गोंदिया जिल्ह्यात येणार आहेत. या दौऱ्यात विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार असून, प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा होणार आहे. तसेच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
शनिवारी, २२ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येईल. तसेच, नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करून त्यावर ठोस उपाययोजना केली जाणार आहे.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, २३ मार्च रोजी रविवारी, खा. प्रफुल पटेल व पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार असून, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे.
यासंदर्भात अधिकाधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

