
मुलचेरा /मारोती कोहरे
आज दिनांक २१मार्च २०२५ रोज शुक्रवारला अडपल्ली चक येथे साजरा करण्यात आला.
. अडपल्ली चक हे गाव मार्कंडा वनपरीक्षेत्रात मोडतो.या गावाला जंगल लागून आहे. या गावात गावकर्यांच्या सहकार्याने आणी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या सौजन्याने गावात जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमात गावातील वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते. तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या माध्यमाने रॅली काढण्यात आली,या कार्यक्रमात वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारोती कोहळे, तंटामुक्ती अध्यक्ष कवडुजी चाल्लावर, पोलीस पाटील सौ मारियाताई कोरडे, ग्रा. प. सदस्य संदीपभाऊ चौधरी, गमतीदास अलोणे, रामचंद्र शेडमाके, माणिक वनकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांनी मनुष्य जाती आणि जंगल यांचा संबंध आणि कोरोनाच्या काळात ऑक्सीजन साठी मनुष्य जातीला कशी मरमर करावी लागली याबद्दल प्रकाश टाकला. आयोजकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मनुष्य जातीला जंगल आणि त्यातील प्राणीमात्रांच्या संवर्धनामुळे काय लाभ होतात आणि त्याचे कसे फायदा घेता येईल हे चित्र लोकांच्या मनात उजवला. या कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा तनुजा माढळे, आर एल बनोत सर क्षेत्र सहाय्यक गुंडापली, व्ही. एल. धात्रक क्षेत्र सह. रेंगेवाही, गणेश आखाडे वनरक्षक, प्रवीण परसवार, शुभम हजारें, सुभाष राठोड, आकाश शेरकी, धमराव दुर्गमवार, भवानी नीलम,महेश मडावी आदी उपस्तित होते. आणी कार्यक्रमाचे संचालन प्रवीण परसवार यांनी केला, तर धमराव दुर्गमवार यांनी आभार प्रदर्शन केला.


