
भामरागड : राज्य शिक्षण व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ‘STARS’ व समग्र शिक्षण अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली अंतर्गत गटसाधन केंद्र भामरागड द्वारा आयोजित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण २.० या पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन गटशिक्षणाधिकारी श्री. जे. एस. वडलाकोंडा यांचे मार्गदर्शनाखाली गट साधन केंद्र भामरागड येथे दिनांक १७/०३/२०२५ ते दिनांक २१/०३/२०२५ या कालावधीत करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाचे औपचारिक उद्घाटन दिनांक १७ मार्च २०२५ रोजी गटशिक्षणाधिकारी श्री. जे. एस. वडलाकोंडा यांचे हस्ते पार पडला. याप्रसंगी भामरागड तालुक्यातील सर्व केंद्रातील केंद्रप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) – प्रस्तावना व संरचना, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) क्षेत्र क्रमांक १ ते ६., शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) परिशिष्टे १ ते ८, क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया., क्षमता आधारित मूल्यांकन – संकल्पना, क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनीती., क्षमता आधारित प्रश्नप्रकार, क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती कौशल्ये., विचारप्रवर्तक प्रश्न (TPQ), गटकार्य अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्ननिर्मिती, समग्र प्रगतिपत्रक (HPC) संकल्पना व पार्श्वभूमी, समग्र प्रगतिपत्रक (HPC) स्तरनिहाय स्वरूप या एकूण सोळा विषयांवर चर्चात्मक रित्या प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणास श्री. कालिदास कुनघाडकर, श्री किशोर मडावी ,श्री. गजानन राठोड, श्री. गुलाब हांडे,श्री.गुरु नगरधने. कु. अनिता मेश्राम, श्री. विनोद कुमोटी यांनी सुलभकाची भूमिका बजावत पाच दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडले.


