महाराष्ट्र पत्रकार संघाच्या आमगाव तालुका अध्यक्षपदी जितेंद्र पटले, सचिवपदी सचिन श्यामकुंवर यांची निवड

0
65
1

आमगाव: महाराष्ट्र पत्रकार संघाच्या आमगाव तालुका अध्यक्षपदी जितेंद्र पटले, तर सचिवपदी सचिन श्यामकुंवर यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख भोला गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

याच कार्यक्रमात गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी धनराज भगत यांचीही नियुक्ती करण्यात आली. पत्रकार संघटनांना बळकटी देण्यासाठी आणि पत्रकारांच्या हितासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने ही नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्याचे संघाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या वेळी गोंदिया जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर, विकीकुमार अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघटनांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, पत्रकारांना विविध स्तरावर सहकार्य करण्यास हे संघटन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे यावेळी सांगण्यात आले.

या नियुक्त्यांमुळे पत्रकार संघटना अधिक सक्षम होईल आणि पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.