आमगाव तालुक्यातील लोडशेडिंग तातडीने बंद करण्याची काँग्रेसची मागणी

0
314
1

आमगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू झालेली विद्युत लोडशेडिंग त्वरित बंद करावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या उपअभियंत्याकडे दि.22 मार्च रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात असून, योग्यवेळी वीज न मिळाल्यास ती सुकण्याची भीती आहे. याशिवाय, सध्या विविध परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही लोडशेडिंगचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे त्वरित ही समस्या सोडवावी, अन्यथा याचा फटका शेतकरी आणि विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

ही मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय बहेकार, तालुका शहर अध्यक्ष देवकांत बहेकार आणि अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष रामेश्वर श्यामकुंवर यांनी केली आहे.याप्रसंगी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

लोडशेडिंगमुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी विभाग व शासनाची राहील, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.

Previous articleस्मार्ट ग्रामपंचायत नहरटोला येथे जागतिक जल दिन उत्साहात साजरा
Next articleसालेकसा तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न