आमगाव: कातुर्ली-इर्री रस्त्यावर रेतीच्या टिप्परचा अपघात, एक ठार, एक गंभीर

0
1029

आमगाव, 24 मार्च 2025 : आज सकाळी 7 वाजता कातुर्ली-इर्री मार्गावर रेतीने भरलेला टिप्पर उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने गोंदिया येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.