

निमाच्या वतीने ३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
सडक अर्जुनी: शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या ९४ व्या शहीद दिनानिमित्त नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) शाखा सडक अर्जुनी व आरोग्य भारती यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवारी (ता. २३) दुर्गा चौकात पार पडलेल्या या शिबिरात ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेची सेवा केली.
शिबिराचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशिवार, पार्वती बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष एल. डी. रहांगडाले, पत्रकार तथा सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम, पत्रकार शाहिद पटेल, निमाचे तालुका अध्यक्ष डॉ. सतीश लंजे, तालुका सचिव डॉ. परमानंद कठाणे, आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉ. आर. एम. देशमुख, तसेच डॉ. प्रभाकर गहाणे, डॉ. धनंजय कापगते, डॉ. दीपाली रहांगडाले, डॉ. प्रवीण उजवणे, डॉ. बाबुराव कोरे, डॉ. दीपक उजवणे, डॉ. देवेंद्र गहाणे आणि आरोग्य भारतीचे सचिव उमेश उदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमान्य टिळक रक्तपेढी, गोंदिया यांच्या चमूने रक्त संकलनाचे कार्य पार पाडले. आयोजकांच्या वतीने रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व टी-शर्ट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच रक्त संकलन करणाऱ्या चमूचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी छगण कापगते, श्रीकांत डोंबळे, अविनाश यावलकर, अमन डोंगरवार, भेसज यावलकर, राहुल मुंगुलमारे, मोहीत मेश्राम, विशाल अंबादे, ईश्वर भोयर, विलास कठाणे तसेच डॉक्टर्स असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि पॅथोलॉजी असोसिएशन यांनी मोलाचे सहकार्य केले.
या रक्तदान शिबिरात सहभाग घेतलेल्या रक्तदात्यांनी शहीदांना अभिवादन करत सामाजिक बांधिलकी जपली.






