

भामरागड – निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने गरीब व गरजू असलेल्या रवी पुगाटी यांना मदतीचा हात देण्यात आला. रवी पुगाटी हे भामरागड येथे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत लहानशा झोपडीत एकटे राहतात. त्यांच्या घरावर केवळ कवले आहेत, मात्र चारही बाजूंनी भिंती नाहीत. अशा कठीण परिस्थितीतही ते आपला संसार चालवत आहेत.
रवी पुगाटी यांच्या परिस्थितीची दखल घेत निसर्ग अभ्यासक फाउंडेशनच्या वतीने त्यांना कपडे व आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीमुळे रवी पुगाटी यांना थोडा दिलासा मिळाला असून, त्यांनी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. कैलास व्हि. निखाडे, मार्गदर्शक डॉ. प्रमोद घोनमोडे आणि प्रा. डॉ. संतोष डाखरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
निसर्ग अभ्यासक फाउंडेशन समाजातील गरजू व गरीब लोकांना मदत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा राहिला आहे. गरजू लोकांना मदतीसाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.






