गुडीपाडव्याच्या निमित्ताने शाळेत ‘प्रवेश वाढवा’ उपक्रमाचा उत्साह

0
229
1

देवरी : गुडीपाडवा हा नवा वर्षारंभाचा आणि नवीन संकल्पांना प्रारंभ देणारा सण. शिक्षण क्षेत्रात प्रवेश वाढावा आणि मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाच्या धोरणानुसार संकल्प पूर्व माध्यमिक शाळा, गहेरवारटोला (पुराडा) येथे ‘गुडीपाडवा व प्रवेश वाढवा’ उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  उत्तम नंदेश्वर (सचिव, प्रबोधिनी प्राथमिक शिक्षण मंडळ, आमगाव) होते. प्रमुख अतिथी म्हणून  विजय बैस (शाळा व्यवस्थापन समिती) व श्री. मदन बैस (सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती) उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून सौ. रेखाबाई बैस (अध्यक्ष, माता पालक समिती) आणि इतर मान्यवर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थितांना शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. ‘शिक्षण हीच खरी गुंतवणूक असून, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध राहावे,’ असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.गुडीपाडवा हा संस्कृतीचा उत्सव असून, शिक्षण आणि संस्कार एकत्र जोडण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. उषा बनकर मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले आणि गोड जेवणाने या उत्सवाचा समारोप करण्यात आला.

गुडीपाडव्याच्या पवित्र सणानिमित्त उपस्थित मान्यवरांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेतल्याने विद्यार्थी शिक्षणाकडे अधिक आकर्षित होतील. प्रशासनाने आणि पालकांनीही या संधीचा लाभ घेत आपल्या पाल्याला उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करण्याचा संकल्प करावा. असे उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविले गेले, तर शिक्षण क्षेत्रात निश्चितच सकारात्मक बदल घडेल.

 

Previous article‘ध्येयरत्न’ पुरस्काराने वशिष्ठ खोब्रागडे सन्मानित
Next articleसुनील तुरकर बने अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघ के राष्ट्रीय संचार प्रमुख