प्रा.छाया बोरकर यांच्या रणरागिणी कादंबरीला वामन होवाड राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

0
131
1

सडक अर्जुनी : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूरच्या अकराव्या वर्धापनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा.छाया बोरकर यांच्या “रणरागिणी” कादंबरीला वामन होवाड राज्यस्तरीय पुरस्कार मधुरम, हिंदी मोर भवन, नागपूर येथे डॉ.प्रकाश करमाडकर,कुलगुरू, त्रिपुरा विद्यापीठ,यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक विभाग मंडळाचे सदस्य राजेश गायकवाड, डॉ. जगन कराडे, साहित्यिक डॉ. विद्याधर बनसोड,डॉ. विजय शेगोकार विशेष कार्यकारी अधिकारी मंत्रालय,डॉ. विलास तायडे, जगन कराडे सुप्रसिद्ध साहित्यिक अकोला,संस्थापक कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीपकुमार खोब्रागडे,अभिनेत्री बबीता डोळस,डॉ.सुनील रामटेके सुप्रसिद्ध नाटककार, यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले असून हा पुरस्कार सोहळा ३० मार्च २०२५ ला विदर्भ साहित्य संघ नागपूर येथे संपन्न झाला.
ह्या सोहळ्यास अनेक नामांकित मान्यवर उपस्थित असून देशातील अनेक ठिकठिकाणाहून अनेक मान्यवर उपस्थित होते.