

प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे अंतर्गत साजरे होणारे श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पाडावेत. या पार्श्वभूमीवर सिहोरा पोलिसांनी सुरक्षा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नागरिकांनी सर्व उत्सव शांततेत पार पाडावेत. असा संदेश देण्याकरिता आज दि.4 एप्रिल रोजी सिहोरा पोलिसांनी रूट मार्च काढला. सदर रूट मार्च ठाणेदार विजय कसोधन यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन सिहोरा येथून मेन रोड, बँक ऑफ इंडिया चौक, बस स्टॉप, गोबरवाही फाटा, मोठा बाजार चौक, दुर्गा मंदिर मार्गे काढून जनतेला शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचा संदेश देण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशनचे 1 अधिकारी, 13 अमलदार, एस. आर. पी. चे 1 अधिकारी,20 अंमलदार व 14 होमगार्ड उपस्थित होते.






