

प्रतिनीधी / प्रफुल कोटांगले
नगरसेवक आशिष अरूण पिपरे व नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांनी कोणतीही फसवणूक केलेली नाही….
सर्व आरोप खोटे राजकीय बदनामी करण्याच्या हेतूने केलेले आहेत उलट त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले
मेक इन गडचिरोली च्या माध्यमातून माजी आमदार डॉ. देवराव होळी व त्यांनी आनलेला तोतया श्रीनीवास दोंतुला (वारंगल) , जिल्हा उदयोग केंद्राचे अधिकारी व आरसेटी गडचिरोली यांचे समुपदेक यांनी आमच्या प्रभागात बैठका घेवून आम्हाला पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रमातून अगरबत्ती उदयोग करण्यासाठी सर्व महिलांना प्रेरीत केले व आम्हा यासाठी आरसेटी गडचिरोली व जिल्हा उदयोग केंद्र यांच्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा तेव्हाचा कार्यकर्ता आशिष अरूण पिपरे यांनी हा आमदाराचा उपक्रम असल्यामुळे व आमच्या प्रभागातील नागरीक असल्याने व त्यांची पत्नी सोनाली आशिष पिपरे, आई मायाताई अरूण पिपरे या दोघी या प्रकल्पात सहभागी असल्याने त्यांनी आम्हाला खुप सहकार्य केले गडचिरोलीतील महिलांप्रमाणे आमचीही एक मशिन देवून फसवणूक होणार होती परंतू आशिषभाऊ पिपरे यांनी वेळीच हा गौडबंगाल आमच्या व बॅकेच्या मॅनेजरच्या लक्षात आणून दिल्यामुळे गडचिरोली शहरातील कनेरी गावातील व घोट येथिल मच्छली या गावातील युवक व महिलाप्रमाणे आमची फसवणूक झाली नाही व आम्हाला प्रत्येकी दोन (हंगटन कंपनीच्या ) अगरबत्ती मशिन व अगरबत्ती ट्रे मिळाले एवढेच नाही तर आशिष भाऊ पिपरे यांनी बॅकेशी व कंपनीशी करार करून आपली स्व्त:ची जागा दिली त्या जागेवर स्वखर्चातून 8 हजार स्केवर फुट लांबीचा टिनाचा शेड बांधून दिला, मोफत लाईट फिटींग, मोफत लाईट, मोफत कच्चा माल दिला व स्व्त: बॅकेतून कर्ज काढून हा प्रकल्प् काही वर्ष चालविला व आम्हाला प्रती एक किलो ओली अगरबत्ती बनविण्यासाठी 10 रूपये मजूरी सुध्दा दिली व आम्हीही बरेच दिवस या प्रकल्पात काम केले व आमच्या कामाचा सर्व मोबदला त्यांनी वेळेत दिलेला आहे एवढे असतांना आशिष पिपरे यांनी प्रकल्पाच्या नावावर आमच्याकडून एक रूपयाही घेतलेला नाही असे असतांना व आम्हा सर्व महिलांना प्रत्येकी 2 मशिन मिळाल्या व त्या अगरबत्ती प्रकल्पात सुरक्षित आहेत व त्या मशिन आम्हाला आपल्या घरी नेण्यासाठी कधिही आशिषभाऊ पिपरे किंवा सोनाली पिपरे यांनी आम्हाला रोखले नाही काही लोकांनी आपल्या जबाबदारीवर आपल्या 2 मशिन आपल्या घरी नेवून ते व्यवसाय करीत असून आम्हा सर्व सहभागी महिलांना मशीन मिळाल्या असून कोणीही प्रकल्प् स्थळी भेट देवून याची खात्री करू शकता यासाठी आजही ही पत्रकार परीषद या प्रकल्प् स्थळी आम्ही सर्व महिला घेत आहोत पत्रकारांनी या प्रकल्पाचे फोटो प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जनतेला दाखवावे ही नम्र विनंती आम्ही सर्व महिला करतो.
परंतू जागतिक कारोना महामारीनंतर कोणत्याच बॅकेने अर्थसहाय्य् न दिल्यामुळे व आर्थिक अडचणीमुळे हा प्रकल्प् मागे पडला व आम्ही सर्व सर्वसाधारण महिला असल्यामुळे मात्र बॅकेचा कर्ज भरू शकलो नाही त्यामुहे मार्च एंडींगमुळे बॅकेकडून आम्हाला कर्जवसुलीसाठी तगादा लावल्या जात आहे मात्र ही प्रक्रिया पुर्णंता बॅकेकडून व जिल्हा उदयोग केंद्राकडून राबविल्या गेल्यामुळे नगरसेवक आशिष अरूण पिपरे व सोनाली पिपरे यांनी पुढाकार घेतल्यासाठी त्यांना आमची फसवणूक केली आहे असे म्हणने चुकीचे आहे यात त्यांचा काहीही दोष नसून त्यांच्यावर केलेले आरोप् बिनबुडाचे व तथ्यहीन असून ते स्व्त: हा प्रकल्प् सुरळीत चालण्यासाठी व आमचे कर्ज माफ करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्वांनी निवेदनातून मागणी सुध्दा केलेली आहे असे आवाहन सौ. ममताताई श्रिमंतवार, सौ. अर्चनाताई कत्रोजवार, सौ. सविता लटारे, सौ. मिराबाई धोडरे, सौ. शुभांगी चिटलोजवार, वैशाली लटारे, सौ. कल्पना नुप्रोजवार, सौ. मायाताई पिपरे सौ. आशा कुंदोपवार, सौ. उषा पिपरे, सौ. संध्याताई कालेजवार, सौ. मनिषा भांडेकर, सौ. सोनाली पिपरे, सौ. प्रिती भुरसे सौ. सुमित्रा लटारे, सौ. प्रतिमा दुधबावरे, सौ. गिता दुधबावरे, सौ. ज्योती पुददटवार व इतर सर्व महिलांनी केलेले आहे.






