

गोरेगाव : तालुक्यातील बबई येथे लग्नाच्या जेवनातून जवळपास 55 ते 60 लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बबई येथील एका कुटुंबीयांकडे मुलाचा लग्न समारंभ होता. या लग्न समारंभामध्ये दिलेल्या जेवणातून जवळपास 55 ते 60 लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विषबाधा झालेल्यांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे. तर यामध्ये 8 बालकांचा समावेश असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गोंदिया येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर 26 लोकांवर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, 7-8 लोकांवर चोपा येथील आरोग्य केद्रामध्ये व काहीं लोकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.






