भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाचा उत्साहात शुभारंभ

0
206
1

खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते कार्यक्रम; हंशाताई खोब्रागडे कार्यकर्त्यांसह पक्षात दाखल

भंडारा  – भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा भव्य शुभारंभ खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ‘हेमंत सेलिब्रेशन’ सभागृहात पार पडला. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सभा भाषणात खा. पटेल यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्य करणारी पार्टी असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरात चावडीवर बसून बूथ कमिटी संदर्भात चर्चा करून अधिकाधिक सभासद नोंदणी करावी. पक्षाच्या विचारधारेत अधिक लोकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

या कार्यक्रमात खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी समाजकल्याण सभापती हंशाताई खोब्रागडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.

कार्यक्रमाला खा. प्रफुल पटेल यांच्यासोबत खालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते –राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, राजूभाऊ कारेमोरे, सुनील फुंडे, धनंजय दलाल, देवेंद्रनाथ चौबे, सरिता मदनकर, एकनाथ फेंडर, संजय गुजर, अनिता नलगोपूलवार, रिताताई हलमारे, नेहा शेंडे, देवचंद ठाकरे, हेमकृष्ण वाडीभस्मे, लोमेश वैद्य, नरेश चून्ने, सदाशिव ढेंगे, नरेंद्र झंझाड, विजय सावरबांधे, आनंद मलेवार, नरेश इलमकर, महादेव पचघरे, आशा डोरले, रजनीश बन्सोड, महेंद्र गडकरी, राहुल निर्वाण, रवींद्र वानखेडे, हरीश तलमले, योगेश सिंगनजुडे, धनु व्यास, हेमंत महाकाळकर, राजकुमार माटे, नारायणसिंग राजपूत, परवेज पटेल, उमेश तुरकर, शेखर गभणे, विनय पशीने, आरजू मेश्राम, राजू पटेल, हितेश सेलोकर, रुपेश खवास, अमन मेश्राम, ठाकचंद मुंगूसमारे, मोहन राऊत, सोनू खोब्रागडे, मंजुषा बुरडे, अतुल परशुरामकर, आशिष दलाल, विजय खेडीकर, मनीष वासनिक, राजेश वासनिक, नागेश भगत यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

Previous articleमहात्मा फुले जयंतीनिमित्त आमगावमध्ये भव्य उपक्रमांचे आयोजन
Next articleविदर्भ साहित्य भारतीच्या नेतृत्वाची धुरा नव्या कार्यकारिणीकडे