

आमगाव : चिळचाळबांध येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एन. बी. बिसेन, सहाय्यक शिक्षक शिवकुमार वाकले, विषय शिक्षक महेश वैद्य, वामन किरमोरे, गणेश शिवणकर, विकेश डोंगरे तसेच स्वाती जाधव मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि संविधानाबाबत जागरूकता निर्माण झाली.






