

गडचिरोली:प्रतिनिधी
विश्वभुषण, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त लोककल्याण फाउंडेशन आष्टीच्या वतीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी द्वारा संचालित सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आष्टी येथील विद्यार्थ्यांना लोककल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राहुल डांगे व त्यांच्या सहचारिणी सौ.ममता डांगे यांच्या सामाजिक ऋण फेडण्याची जाणिवेतून त्यांनी शाळेतील गरजू व गरीब १३० विद्यार्थ्यांना स्कुल बॅग चे वितरण केले.यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व तरुण कार्यकर्ता तनूश्रीताई आत्राम अहेरी, जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचारनिवारण समितीचे जिल्हाध्यक्ष. श्री संतोष भाऊ ताटीकोंडावार कमलापूर , ग्रामपंचायत आष्टीच्या सरपंच सौ बेबीताई बुरांडे, पोलिस स्टेशन आष्टीच्या पी.स. आय.जगताप मॅडम,गगन मल्लिक फाउंडेशनचे अध्यक्ष श्री वाघमारे साहेब चंद्रपुर, श्री करमे साहेब सरपंच महागाव, सामाजिक कार्यकर्ते श्री पंकजभाऊ पसफुलवार आष्टी,सौ.अर्चना निमसरकार शाळेच्या मुख्याध्यापिका कु.एस डी गलबले,सौ प्रतिभा खोब्रागडे,सौ ज्योती वाकडे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग चे वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तनूश्रीताई आत्राम यांनी शिक्षणामुळेच व्यक्तिचा विकास होतो व प्रगती होते, असे सांगितले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ ताटीकोंडावार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन मोठा व्यक्ती होण्याचे आवाहन केले.सरपंच बेबीताई बुरांडे यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार अंगी करायला सांगितले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री आर एम शेरेकर, यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक श्री महेंद्र उद्धवराव खोब्रागडे यांनी केले.उपस्थित पहूण्याचे आभार श्री कपील मसराम यांनी मानले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री पी. टी.वाकडे,श्री बी . ए .क्षिरसागर,श्री टी.एम मल्लेलवार, कु.आचल अन्नमवार,सौ प्रीती निमगडे यांनी सहकार्य केले.इयत्ता १ली ते सातवी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.






