लाखनी : तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील जिल्हा परिषद क्षेत्रातील अशोक वरिष्ठ प्राथ. शाळा तथा अशोक विद्यालय रेंगेपारकोठा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न, संविधान निर्मिते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भीम गीत व वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गजभिये प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम देशमुख सहा. शिक्षक रमण लोणारे, सुशील काडगाये यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. मोहन बोंदरे यांनी प्रास्ताविक केले तर विनोद गिरी यांनी आभार व्यक्त केले.

