लाखनी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा व विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधिर कुकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक चंद्रशेखर भुसारी, जयंता लाडे, विलास निंबार्ते, सैनिकी निदेशक मार्कंड कापगते, शिक्षक भारती संघटना कार्यवाह विनोद किंदले॔,प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गीतांचे सादरीकरण व भाषणाच्या माध्यमातून बाबासाहेबायांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविकातून विनोद किंदले॔ यांनी मानवी स्वराज्याचे संस्थापक महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विश्वातीलं एकमेव आश्चर्य रक्ताचा एकही थेंब न सांडता माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे, जातीच्या तुकडयांमध्ये विभागलेल्या भारताला समतेच्या धाग्यात ओवून राष्ट्र निर्माण करणारे शिल्पकार, धार्मिक विचार व शैक्षणिक विचार बाबासाहेबांनी सांगितलेले यांची आज का गरज आहे हे सांगताना धार्मिक स्वातंत्र्य म्हणजेच स्वयराचार नव्हे धर्म म्हणजे नितीनियम धारण करणे होय शिक्षण घेतल्याने माणूस जगावर अधिराज्य करू शकतो व अन्यायाविरुद्ध अभ्यासपूर्ण आवाज उठवू शकतो असे बाबासाहेबांनी सांगितलेले विचार सांगून त्यांचा गुणगौरव केला. अध्यक्षीय भाषणात सुधिर कुकडे यांनी बाबासाहेबांच्या जिवनातील खडतर प्रवास सहन कराव्या लागलेल्या हाल अपेष्टा दिनदुबळ्या दिंनदलितांसाठी व भारताच्या नवनिर्मितीसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्याव खंडारे तर आभार प्रेमकुमार हालमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा.शिक्षक नितेश पुरी,तिलक हलमारे, यशपाल मेश्राम, सचिन तितीरमारे ,पुरुषोत्तम कांडगाये, छगन बोपचे,महेश मडावी, सुनील बोरकर, सुनील कडव,संदीप बोरकर, खेमराज चेटुले, विलास दिघोरे, विलास राऊत व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

