अंतिम यात्रा मंगळवारी, १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता; कामठा येथे शोककळा
आमगाव – संत लहरीबाबा आश्रम संस्थान, कामठा यांचे अध्यक्ष आणि लहरी परिवारातील सर्वांचे लाडके प. पु. गोपालबाबा यांचे आज अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने लहरी विचारसरणीचा एक तेजस्वी दीप मालवला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
गोपालबाबा यांनी आयुष्यभर आध्यात्मिक सेवेच्या माध्यमातून समाजात शांतता, प्रेम आणि सद्विचार यांची शिकवण दिली. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली लहरीबाबा आश्रम संस्थान कामठा हे एक श्रद्धास्थान बनले. त्यांनी समाजिक, धार्मिक व मानवीय मूल्यांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम राबवले.
त्यांची अंतिम यात्रा मंगळवार, दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वाजता कामठा येथून निघेल व त्यांच्या पार्थिवावर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने लहरी परिवार, आश्रमातील भक्तगण तसेच परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व विस्तृत असा आप्त परिवार आहे.

