गोरेगाव – तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक १४ एप्रिलला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी ग्राम पंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, संस्थेचे उपाध्यक्ष जे जे पटले सर, सदस्य हिरालाल महाजन, प्रमानंद तिरेले, वाय एफ पटले सर, तंन्टामुक्त गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, पोलिस पाटील राजेश येळे, शिवराम मोहनकार, तेजलाल कावडे, मुकेश येरखडे, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंन्डे, योगराज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी सांगितले भारत भूमीच्या क्षितिजावर अनेक तेजस्वी तारे चमकले काही तार्याचे रूपांतर उत्क्रांत घेऊन काळाच्या उदरात लोप पावले. परंतु एका अलौकिक तार्याने आपले तेज दिवसेंदिवस वाढतच नेले. तो तारा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होत. आज १४ एप्रिल रोजी त्यांची जयंती साजरी केली जात आहे. बाबासाहेबांचे मूळनाव भीमराव होते. पुढे शाळेतील आंबेडकर गुरूजी मुळे ते बाबासाहेब आंबेडकर झाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेब पहिले कायदामंत्री झाले. घटना समितीचे अध्यक्ष होते. १९४९ मधे हिंदू कोड बिल त्यानी पास करून घेतले. त्यानंतर १९५१ ला मंत्रिमंडळातील पदाचा राजीनामा देऊन १९५२ साली अमेरिकेत गेले. अशा महान व्यक्तिमत्त्व असणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती साजरी करण्यात आली आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी गावातील नागरिक व वाचक विध्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार संस्थेचे सचिव सुभाष चौरागडे यांनी केले.

