शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग; अनुयायांना अल्पोपहाराचे वितरण
गोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. तालुकाध्यक्ष मोरेश्वर बडवाईक आणि सरचिटणीस चंदू दुर्गे यांच्या नेतृत्वात व मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समिती चौकात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश हर्षे, तसेच पंचायत समिती गोंदिया चे उपसभापती शिवलालजी जामरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी अनुयायांना आणि नागरिकांना बिस्किट पाकिटांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा नेते वीरेंद्र कटरे, राज्य संघटक नुतन बांगरे, विभागीय अध्यक्ष केदारनाथ गोटेफोडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख यशोधरा सोनवाने, संचालिका नितू डहाट, राज्य प्रतिनिधी अनिरुद्ध मेश्राम, अयुब खान, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पटले, जिल्हा संपर्क प्रमुख विनोद लिचडे, जिल्हा कोषाध्यक्ष राजू निंबार्ते, जिल्हा कार्यचिटणीस सुनील सोनवाने, जिल्हा प्रवक्ता लिकेश हिरापुरे, किशोर शहारे, तालुका नेते वाय. डी. पटले, संचालक चंद्रशेखर दमाहे, जिल्हा संयोजक गणेश चुटे, तालुका अध्यक्षा अनिता फब्यानी, जिल्हा महिला प्रतिनिधी सिंधूताई मोटघरे, मार्गदर्शक मधुकर मेंढे, वशिष्ठ खोब्रागडे (विषय साधनव्यक्ती व जिल्हाध्यक्ष प्रतिनिधी) यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमात मनिष राठोड, देव जतपेले, के.के. पटले, केशव मानकर, राजेश गावळ, माणिक घाटघुमर, तेजकुमार बिसेन, मनिष बलभद्रे, ओमप्रकाश पटले, विजय लिल्हारे, दत्तात्रय बागडे, वाय.बी. चावके, सचिन वडीचार, हर्ष पवार, निरंजन सोनकल्यारी, तारेंद्रकुमार टेंभूर्णे, आनंद मेश्राम, अरुण राहुलकर, आर.जी. सार्वे, सतिश नागपुरे, विलास धकाते, के. एल. कावळे, चरण सुर्यवंशी, संतोष टेंभरे, टी.एफ. चौधरी, विनोद सुर्यवंशी, सुनील पाटील, अरुण कटरे, ओ.बी. चौधरी, मुनेश्वर जैतवार, नंदू चित्रीव, एम. जी. हांडे, सतीश राऊत, शैलेश गौतम, शिवाजी बडे, मयुर राठोड, मंजू उके, रेखा चौधरी, चित्रलेखा ठाकरे, रत्नप्रभा गजभिये, प्रियंका मेश्राम, निलकंठ खोब्रागडे, मेश्राम सर, गणवीर सर, डोंगरे सर, पृथ्वीराज टेंभुर्णीकर, मनीषा रामटेके, उर्मिला गजभिये, प्रतिभा गणवीर, वर्षा बागडे आदीं मान्यवर शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य, प्रेरणा व समतेचा संदेश देणारी बाबासाहेबांची जयंती शिक्षक संघाच्या माध्यमातून प्रभावीपणे साजरी करण्यात आली.

