सडक अर्जुनी : तालुका विधी सेवा समिती, सडक अर्जुनी आणि तालुका वकील संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती प्रित्यर्थ बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र ‘वाचाल तर वाचाल’ यास खऱ्या अर्थाने अंगीकृत करण्याचा मानस मनाशी बाळगून तब्बल १८ तास साखळी पद्धतीने अखंड वाचन मोहीम पहाटे ४ वाजे पासून सुरू करून रात्री १० वाजे पर्यंत करण्यात आली. यातून वाचनाला प्रेरणा आणि प्रोत्साहण देण्याकरिता सर्व सहभागी वाचकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे आणि शिवाजी कोण होता? ही पुस्तके भेट देण्यात आली. वाचन एक चळवळ ही मोहीम सर्वांच्या मनात रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न याद्वारे करण्यात आला.
सकाळी १० वा. डॉ.विक्रम अं.आव्हाड अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, सडक अर्जुनी आणि एडवोकेट डी एस बनसोड, अध्यक्ष, तालुका वकील संघ सडक अर्जुनी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समोर द्वीप प्रज्वलन करून माल्य अर्पण केले. तत्पूर्वीच पहाटे ४ वाजे पासून साखळी वाचन मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. सर्वप्रथम डॉ. प्रणित पाटील, (तालुका वैद्यकीय अधिकारी, सडक अर्जुनी) यांनी पहाटे ०४ ते ०६ पर्यंत साखळी वाचनास सुरुवात केली त्यानंतर ०६ ते ०८ च्या दरम्यान एडवोकेट कुंदन रामटेके त्यानंतर ०८ ते १० वा. एडवोकेट डी.एस. बन्सोड, सह. सरकारी अभियोक्ता ओ एस गहाणे यांनी वाचन केले, त्यानंतर १० ते १२ वा. एडवोकेट एस बी गिरीपुंजे, एडवोकेट योगेश थोटे व न्यायालीयन कर्मचारी जुबेर खान यांनी वाचन केले त्यानंतर दुपारी १२ ते ०२ च्या दरम्यान श्री कपिल पिल्लेवान वरिष्ठ लिपिक व श्री एन जे लांजेवार सहाय्यक अधीक्षक यांनी वाचन केले त्यानंतर ०२ ते ०४ च्या दरम्यान एडवोकेट सी पी शंभरकर व ०४ ते ०६ च्या दरम्यान एडवोकेट आर के लंजे यांनी वाचन केले, त्यानंतर ०६ ते ०८ च्या दरम्यान डॉ.विक्रम अं.आव्हाड (अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी) व डॉ. संगीता आव्हाड ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गोंदिया यांनी वाचन केले, त्यानंतर ०८ ते १० च्या दरम्यान पोलीस शिपाई हरिदास ईस्कापे यांनी वाचन केले अशा प्रकारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १८ तास साखळी वाचन करून खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

