सालेकसा : प्रगती कॉलनी सालेकसा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहरजी बारसे यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त वन अधिकारी रुपचंद चूटे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक
शीलाताई कुंभरे,पोलीस शिपाई अर्चना दोनोडे, पोलिस शिपाई सोनम बडोले,पोलिस शिपाई राहुल भेंडारकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शक केले. शिलाताई कुंभरे यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हिता साठी, महिलांनी सन्मानाने जगावे यासाठी संविधानात जी तरतूद करून ठेवली, हिंदू कोड बिल यावर लक्ष केंद्रित केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात मनोहरजी बारसे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अतोनात कष्ट भोगून सपूर्ण भारत वासियांसाठी एक आदर्श निर्माण केला. संविधानामुळे आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात सर्व जातीचा लोकांना काम करण्याची संधी मिळत आहे हे फक्त संविधानामुळे भावी पिढीने यांचा आदर्श बाळगावा असा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमाला सरस्वताबाई चूटे, पर्वता पंधरे, कविता येटरे, संगीता पंधरे, गीता एकुलकर , ममता चूटे, योगिनी आडव, चैताली येटरे, लावण्या बारसे, आराध्या पंधरे, रिद्धी मिसार, मैथिली मिसार , मृणाल मिसार साई ,विपुल साई, वेघा कुंभरे आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पंचायत समिती सदस्य अर्चना अंबरलाल मडावी यांनी तर प्रस्ताविक आशा मीसार व आभार दीपाली बारसे यांनी मानले.

