
मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे मनोगत; आठवणींना उजाळा
आमगाव – जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे आज इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. एन. बी. बिसेन सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाशिपार शाळेचे मुख्याध्यापक अनिल रामटेके सर उपस्थित होते.
शाळेतील शिक्षक एस. एस. वाकले सर, एम. बी. वैद्य, डब्लू. डी. किरमोरे, कुमारी एस. जे. जाधव मॅडम, जी. पी. शिवणकर व व्ही. एस. डोंगरे यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला, तर सर्व शिक्षकांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांना पुढील शिक्षण व आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


