खाकीतील सेवेतून शासकीय प्रशासनात यशस्वी वाटचाल – राजेश चौधरींची महसुली विभागात निवड

0
399
1

आमगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एमपीएससी गट ‘क’ परीक्षा यशस्वी; यशाचे श्रेय आई-वडील व मित्रमंडळींना

गोंदिया :  जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सितेपार गावचे राजेश दशरथ चौधरी यांनी एमपीएससी गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा 2023 यशस्वीपणे उत्तीर्ण करत महसुली विभागात सहायक पदावर आपली निवड निश्चित केली आहे.
राजेश चौधरी हे सध्या आमगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सिपाही पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या नोकरीसोबत अभ्यासाचे संतुलन राखून हे यश प्राप्त केले आहे.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडीलांच्या आशीर्वादाला व मित्रमंडळींच्या प्रोत्साहनाला दिले आहे. त्यांचे हे यश ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गावपातळीवरून स्पर्धा परीक्षांतून शासकीय सेवेत प्रवेश मिळवणाऱ्या राजेश चौधरी यांच्यावर परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Previous articleठाणेगावचा डॉ. पंकज पटले यांची UPSC यशस्वी घोडदौड – तिरोडाचा अभिमान
Next articleपहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध मोर्चा