

अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गांमध्ये आरक्षण वाटप; महिलांसाठी मोठ्या प्रमाणात संधी
आमगांव : जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या १६ एप्रिल २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि तहसिल कार्यालय, आमगांव येथील सभागृहात आज २४ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या सोडतीद्वारे आमगांव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या आरक्षण प्रक्रियेमध्ये विविध सामाजिक घटकांसह महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.
आगामी पंचवार्षिक कालावधी २०२५ ते २०३० करिता आमगांव तालुक्यातील एकूण ५७ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी सतीश वेलाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिल कार्यालय आमगांवच्या सभागृहात ही आरक्षण सोडत पार पडली. या वेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणानुसार विविध सामाजिक प्रवर्गांमध्ये पुढीलप्रमाणे आरक्षित पदांचे वाटप करण्यात आले:
अनुसूचित जाती महिला (SC-W):
सोनेखारी, घाटटेमनी, कालीमाटीअनुसूचित जाती (SC):
खुर्शीपार, किकरीपारअनुसूचित जमाती महिला (ST-W):
खुर्शीपारटोला, पानगावअनुसूचित जमाती (ST):
गिरोला, बाम्हणी, फुक्कीमेटानागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला (VJ/NT/OBC-W):
भजियापार, पिपरटोला, मरारटोला, आसोली, धामनगाव, करंजीनागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (VJ/NT/OBC):
येरमडा, गोरठा, मानेगाव, तिगाव, जांभुरटोलासर्वसाधारण महिला (General-W):
कातुर्ली, बंजारीटोला, सितेपार, जामखारी, भोसा, टाकरी, डोंगरगाव, बोदा, शिवणी, गोसाईटोला, टेकरी, बुराडीटोला, सरकारटोला, सुरकूडा, अजोरा, पाऊळदौणा, बोथली, बासीपारसर्वसाधारण (General):
बोरकन्हार, दहेगाव, वळद, चिरचाळबांध, बघेड़ा
मूंडीपार, सुपलीपार, ठाणा, ननसरी, सावंगी, नंगपुरा, मोहगाव, महारीटोला, रामाटोला, धावडीटोला, कटटीपार, जवरी, कवडी
या आरक्षण प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामाजिक न्यायाचे तत्व अधिक बळकट होणार असून विविध घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित होणार आहे. महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे ग्रामीण भागात महिलांचे नेतृत्व अधिक प्रभावी होईल, असे ग्रामविकास तज्ज्ञांचे मत आहे.
या आरक्षणानंतर स्थानिक राजकारणात हालचालींना वेग येणार असून, सरपंच पदाच्या इच्छुकांसाठी पुढील दिशा स्पष्ट होऊ लागली आहे.






