सालेकसा तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

0
236
1

तहसील कार्यालय सालेकसा येथे २४ एप्रिल रोजी आरक्षण सोडतीचे आयोजन; विविध प्रवर्गांसाठी पदे निश्चित

सालेकसा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीतील सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी, गोंदिया यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी तहसील कार्यालय सालेकसा येथे पार पडला.

या कार्यक्रमात प्रभारी तहसीलदार अमृता सुतार, नायब तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी टी. टी. गिरेपुंजे, नायब तहसीलदार दिनकर खोत यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवर्गानुसार आरक्षणाची यादी पुढीलप्रमाणे:

अनुसूचित जाती (SC महिला):
कारूटोला, सोनपुरी

अनुसूचित जाती (SC):
जमाकुडो

अनुसूचित जमाती (ST महिला):
झालिया, दरबड़ा, कोटजंभोरा, कावराबांध, गोर्रे

अनुसूचित जमाती (ST):
बिंझली, रोंढा, बाम्हनी, पाथरी, कोटरा

इतर मागासवर्ग (OBC महिला):
नानव्हा, भजेपार, मुंडीपार, सातगाव

इतर मागासवर्ग (OBC):    नवेगांव, कोसमतर्रा, कडौतीटोला, निंबा

सर्वसाधारण महिला:
बोदलबोडी, खोलगड, लोहारा, पांढरवाणी, मानागड, खेडेपार, पाऊडदौना, टोयागोंधी, पिपरिया

सर्वसाधारण (General):
कहाली, पोवारिटोला, लटोरी, धानोली, तिरखेडी, बीजेपार, गिरोला, मक्काटोला, दरेकसा, गांधीटोला

या आरक्षण सोडतीनंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयारीस प्रारंभ होणार असून, तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यवस्थापनात सामाजिक समावेश आणि प्रतिनिधीत्व सुनिश्चित करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.