

गुणपडताळणी, नाव दुरुस्ती आणि प्रवेश परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी www.mscepune.in व puppssmsce.in संकेतस्थळांवर भेट द्या
राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा – पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल जाहीर
पुणे, दि. (२४ एप्रिल) : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) तसेच विविध सरकारी निवासी शाळांमधील प्रवेश परीक्षांचा अंतरिम निकाल २५ एप्रिल २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल अधिकृत संकेतस्थळांवर प्रकाशित होतील.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:
www.mscepune.inhttps://puppssmsce.in
या परीक्षांमध्ये खालीलचा समावेश आहे:
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
निकाल कसा पाहावा? : विद्यार्थ्यांचे निकाल संबंधित शाळांच्या लॉगिनद्वारे उपलब्ध असतील. विद्यार्थी व पालक वरील संकेतस्थळांवरून थेट निकाल पाहू शकतील.
गुणपडताळणी व दुरुस्ती प्रक्रियेला प्रारंभ:
उत्तरपत्रिकेतील गुणांबाबत शंका असल्यास, २५ एप्रिल ते ४ मे २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये शुल्क लागू आहे.
विद्यार्थ्यांच्या नाव, पालकांचे नाव इत्यादी दुरुस्तीचे अर्ज सुद्धा याच कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करता येतील. मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
शाळा माहिती दुरुस्ती:
शाळेचा क्षेत्रनिहाय वर्ग (शहरी/ग्रामीण) अथवा अभ्यासक्रम बदल आवश्यक असल्यास, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह विनंती पत्र puppsshelpdesk@gmail.com वर ४ मे २०२५ पर्यंत पाठवावे.
अंतिम निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार:
गुणपडताळणी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत शाळांच्या लॉगिनमध्ये निकाल प्रदर्शित केला जाईल. त्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.






