
गडचिरोली/प्रफुल कोटंगले
राष्ट्रीय महामार्ग 353 च्या संथ गतीने व नित्कृष्ट होणाऱ्या बांधकामाला त्रस्त होऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी कोंडावार यांनी 28 एप्रिल पासून सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन पुकारले होते. दोन दिवसापूर्वी या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंतांनी सदर कामाची पाहणी केली होती व तात्काळ सदर बांधकाम सुरू होईल असे आश्वासन ताटीकोंडावार यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर आज तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी आंदोलकांची बैठक लावून संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.सदर बांधकाम 15 दिवसात पूर्ण झाले नाही तर सदोष मनुष्यवधचा गुन्हा काम करणाऱ्या चार कंत्राटदारांवर दाखल करण्यात येईल असे लेखी आश्वासन घेतल्यानंतरच 28 तारखेला होणारा चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी कोंडावार यांनी दिली आहे.


