
688 वा क्रमांक पटकावणाऱ्या सचिन बिसेनचा आमगाव येथील निवासस्थानी सहकुटुंब सन्मान; शिक्षक समाजासाठी ठरतोय प्रेरणास्थान
गोंदिया : यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2024 मध्ये देशात 688 वा क्रमांक पटकावणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील सचिन श्रुती मुन्ना बिसेन यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदिया शाखेच्यावतीने आमगाव येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन सहपरिवार शाल, मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाचा गौरव करताना शिक्षक समितीने संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे.
सचिन बिसेन यांच्या आई झालिया केंद्राच्या केंद्रप्रमुख असून, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या मुलाने मिळवलेले हे यश शिक्षक कुटुंबासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळेच शिक्षक समितीच्यावतीने हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सत्कार समारंभादरम्यान सचिन बिसेन यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाबाबत अनुभव कथन केले. परीक्षेतील अडचणी, तयारीची दिशा आणि मानसिक धैर्य याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने अशाच परीक्षा देऊन यशस्वी व्हावे, असे शुभेच्छा संदेश दिला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार, सुशील पाऊलझगडे, के.जी. रहांगडाले, शोभेलाल ठाकूर (संचालक), ई.एफ. देशमुख, दिलीप होटे, दादाजी पंधरे, पी.एम. ढेकवार (अध्यक्ष), सेवक डी. रहांगडाले (सरचिटणीस), आर.एस. बसोने, यू.जी. फरदे, एम.एन. निंबार्क, के.एम. कटरे, पी.आर. ठाकरे, एस.पी. बैठवार, कु. दिव्या गुप्ता, मुरली चव्हाण, गणेश लोहाडे, के.बी. देशमुख, एल.सी. चौधरी, एन.जी. कांबळे, धनराज दहीलकर, जी.पी. नान्हे, आर.एस. चौधरी, दिलीप कुऱ्हाये, संतराम जाधव, शरद उपलपवार, आर.ई. खापर्डे, बी.एस. केसाळे, कु. स्नेहा रामटेके मॅडम, बापूसाहेब गुंडे सर यांच्यासह आमगाव व सालेकसा तालुक्यातील शिक्षक समितीचे अनेक तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन बिसेन यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण शिक्षक समाजाचे यश आहे, अशी भावना यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.


