आलापल्लीत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त….

0
262
1

आलापल्ली २९/०४/२०२५

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आणि महाराष्ट्रात सुगंधीत तंबाखूला बंदी असून सुद्धा परिसरात अनेक ठिकाणी सुगंधित तंबाखूचा सर्रास विक्री होतो आज दिनांक २९/०४/२०२५ सुगंधी तंबाखूचा मोठा साठा अहेरी पोलीस उत्तम कामगिरीमुळे साठा जप्त करण्यात आला.

 

अप.क्र.व कलम-१०९/२०२५ कलम १२३,२७४,२७६,२७७ बिएनएस

फिर्यादी सरतर्फे पोहवा मनोज शेंडे बन ११६५ वय ४० वर्षे, पोस्टे अहेरी

आरोपी नामे- रूणाल झोरे वय ३३ वर्ष रा सावरकर चौक आलापल्ली ता.अहेरी जि. गडचिरोली फरार असल्याची माहिती.

आरोपी वनविभाग कर्मचारी यांचे पडीत घरात,सावरकर चौक आलापल्ली येथील घर असून तंबाखूचा साठा ठेवण्यासाठी दुरुपयोग केल्याचे आहे.आज अहेरी पोलीस स्टेशनचे छापेमारी मध्ये घटना ता. वेळ दिनांक २९/०४/२०२५ चे १.३० वा. दरम्यान दाखल ता वेळ दिनांक २९/०४/२०२५ चे ८.५९ वा. साना क्र. १६/ २०२५ मुद्दे माल- ६,७३,२००/-रु.

एका पांढ-या रंगाच्या चुंगळीमध्ये मजा १०८ हुक्का शिशा तंबाकू असे लिहीलेले होते २०० ग्रॅम वजनाचे ४० डब्बे असे एकुण १८ चुगळयांमध्ये ७२० डब्बा प्रति डब्बा किमत ९३५ रू प्रमाणे एकुण ६,७३,२००/-रु चा मुद्देमाल

१६,४००/-रु. एका पिवळ्या रंगाच्या चुंगळीमध्ये होला हुक्का शिशा तंम्बाकु असे लिहीलेले एक किलो वजनाचे १० पाउच असे एकुण २ चुंगळयामध्ये २० पाउच प्रति पाउच विक्री किंमत ८२० रू प्रमाणे एकुण १६,४००/-रु. चा मुद्देमाल

 

१२,४००/-रु. एका पांढ-या रंगाच्या चुंगळीमध्ये ईगल हुक्का शिशा तम्बाकु असे लिहीलेले किलो वजनाचे ८ पाउच प्रति पाउच विकी किंमत १५५० रू प्रमाणे एकुण १२,४००/-रु. चा मुद्देमाल

 

५२,९२०/-रु. दोन खाकी रंगाच्या बॉकस मध्ये सिग्नेचर फीनेस्ट पान मसाला असे लिहीलेले

एकुण ९८ वॉकस वजन २१६ ग्रॅम वजनाचे प्रति बॉक्स विकी किंमत ८२० प्रमाणे एकुण ५२,९२०/-रु. चा मुद्देमाल असा एकुण – ७,५४,९२० / – रु. मुद्देमाल  हकिकत, याप्रमाणे आहे की, नमुद घटना ता.वेळी व ठिकाणी यातील आरोपी याने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू चा वर नमुद वर्णनाचा मुद्देमाल विक्रीकरीता स्वत:जवळ बाळगून मिळुन आल्याने फीर्यादीच्या लेखी फीर्याद वरून सदरचा गुन्हा नोद केला आहे

दाखल अंमलदार मपोहवा /२६६२ वंदना डोनारकर, पोस्टे अहेरी

तपासी अधिकारी सपोनि पटले, तपास अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु आहे..

Previous articleजिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू..
Next articleगोंदियात बनावट इंग्रजी दारूचा गोरखधंदा उघड – कारखाना उद्ध्वस्त, तिघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त