“भारतीय साहित्यातील रामदर्शन” पुस्तकाचा नागपूरच्या राजवाड्यात भव्य प्रकाशन सोहळा

0
295
1

श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या शुभ हस्ते प्रकाशन; सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे लिखित ग्रंथाला साहित्यिकांची भरभरून दाद

नागपूर : येथील ऐतिहासिक आणि गौरवशाली श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या प्राचीन राजवाड्याच्या प्रांगणात एक भव्य साहित्यिक सोहळा दि.२ मे रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे लिखित “भारतीय साहित्यातील रामदर्शन” या समीक्षात्मक लघुपुस्तिकेचे प्रकाशन श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

हा कार्यक्रम अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ व समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अँड. लखनसिंह कटरे (अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांत) यांनी भूषवले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून मा. प्रकाश एदलाबादकर (सुप्रसिद्ध साहित्यिक) यांनी उपस्थित राहून आपल्या विचारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या प्रकाशन सोहळ्याला चंद्रकांत लाखे (कार्याध्यक्ष, अ. भा. साहित्यक्षेत्र परिषद, विदर्भ) व डॉ. ईश्वर नंदुपुरे (अध्यक्ष, समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र) यांचे विशेष सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रम सिनियर भोसला पॅलेस (मोठा राजवाडा), महाल, नागपूर येथे सायं. ६:३० वाजता संपन्न झाला.

या वेळी उपस्थित साहित्यप्रेमींनी डॉ. नाईकवाडे यांच्या अभ्यासपूर्ण लेखनशैलीची आणि रामकथेतील विवेचनाच्या आधुनिक दृष्टिकोनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. भारतीय साहित्यातील रामदर्शन ही पुस्तिका आधुनिक साहित्यविचारांना नवसंजीवनी देणारी ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

हा प्रकाशन सोहळा साहित्यिक वातावरणात भर घालणारा आणि विचारवंतांच्या गूढ चिंतनांना चालना देणारा ठरला.

Previous articleमहाराष्ट्र दिनी आमगाव तालुका कार्यकारिणी गठीत; संघटनेच्या विस्ताराला नवे बळ
Next articleस्त्री शक्तीचा जयघोषः सांस्कृतिक महोत्सवात महिलांचा उजवा सहभाग