

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एक महिन्यापासून फरार कसा..?
आदिवासी समाज व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील श्री गुरुदेव आश्रमशाळा कमलापूर या शाळेतील २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळप्रकरणी शाळेतीलच 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी दिलीपकुमार भिवाजी राऊत यांना अटक करण्यात आली. मात्र, आरोपी श्याम पांडूरंग धाईत 1 महिन्याचा कालावधी लोटूनही मोकाटच असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.श्री गुरुदेव आश्रमशाळा कमलापूर येथील २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडितांच्या तक्रारीवरून 8 एप्रिल रोजी शाळेतीलच कर्मचारी श्याम धाईत व दिलीप राऊत यांचेवर बालकांचे लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, संबंधित गुन्हेगार कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी खंडणी मागिल्याचे कारण पुढे करीत त्यानंतर फरार झाले होते. यातील आरोपी श्याम धाईत यांनी गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला केला होता. न्यायालयाने जामीन अर्ज रद्द केल्यापासून आरोपी चौकशीला पुढे न जाता फरार आहे. तब्बल १ महिन्याचा कालावधी लोटूनही पोलिस आरोपीला अटक करण्यात यशस्वी न झाल्याने त्याच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केल्या जात आहे.”संबंधित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याद्वारे आश्रमशाळेतील आदिवासी २ मुलींवर अत्याचार झाला आहे. याप्रकरणी आरोपी श्याम धाईत याला आजपर्यंत अटक झाली नसल्याने स्थानिक जनतेसह आदिवासी समाजामध्ये पोलिस प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासनाने तत्परता दाखवित आरोपीला अटक करणे गरजेचे आहे. सदर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिक्षण संस्थाचालक तसेच सचिवासही अटक करण्यात यावी. अन्यथा, पालक वर्गासह स्थानिक आदिवासी समुदायाला घेऊन आमरण उपोषण छेडणार “- नागेश मडावी, राकाँ, अहेरी तालुकाध्यक्ष






