

सडक अर्जुनी : मा. ना. उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती, सडक अर्जुनी व वकील संघ, सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयात शनिवारी दि. १० मे २०२५ रोजी प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्याकरिता सन २०२५ मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात एकूण ६८०५ प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा समोपचारने करण्यात आला व त्यात एकूण २०,६०,४३२ रुपयांची वसुली करण्यात आली. संपूर्ण गोदिया जिल्हात पुन्हा एकदा तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनीस अव्वल स्थानावर येण्याचा बहुमान मिळाला.
लोक न्यायालयाचे उद्घाटन न्यायालयातील शिपाई एल. डी. ठलाल ए. ए. शेंद्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, सहा. पोलीस निरीक्षक पवार मॅडम, वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट डी. एस. बनसोड , जेष्ठ अधिवक्ता एस. बी. गिऱ्हेपुंजे, एडवोकेट श्रीमती रिता राऊत, एडवोकेट श्री कुंदन रामटेके, एडवोकेट श्री. व्ही. डी रहांगडाले, सहाय्यक सरकारी अभियोगता श्री ओ.एस गहाणे, एडवोकेट योगेश थोटे उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, जिल्हा न्यायाधीश १ ए. एस. प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश २ एम. टी. असीम, जिल्हा न्यायाधीश ३ एन डी खोसे, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदियाचे सचिव श्री एन. के. वाळके यांच्या मार्गदर्शना अंतर्गत लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयाच्या यशस्वीते साठी गटविकास अधिकारी आर. आर. सानप, वकील संघ, पंचायत समितीचे पदाधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, बँक , वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, वृत्तपत्र माध्यमे व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.






