

अन्वेषा डेकाटे द्वितीय, चेतना विठ्ठले तृतीय; सर्व विद्यार्थ्यांचे यश शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
आमगाव – के. के. इंग्रजी प्रायमरी शाळेने यंदा दहावीच्या सीबीएससी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. शाळेच्या सलोनी मोहरे हिने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या खांद्याला खांदा लावत अन्वेषा डेकाटे हिने ८८% गुणांसह द्वितीय व चेतना विठ्ठले हिने ८५% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
फक्त ही तिन्ही नव्हे, तर शाळेतील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन संस्थेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे. या गौरवपूर्ण यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, सदस्य ललित मानकर, सदस्या श्रीमती स्नेहा मानकर, शाळेचे प्रमुख डॉ डी. के. संगी सर आणि प्राचार्या श्रीमती रीना भुते मॅम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक, प्राचार्य तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. शाळेचा उत्तम शैक्षणिक दर्जा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.






