

प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर-#OperationSindoor च्या माध्यमातून भारताने दहशतवादाच्या विरोधात नवीन लक्ष्मणरेषा रेखाटली आहे. या ऑपरेशनमधून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य जगाला दिसून आले. भारतमातेच्या वीरपुत्रांनी गाजवलेले शौर्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.या ऑपरेशनमधील विजयानंतर भारतीय तीनही दलातील वीरांना सलाम करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) शिवसेना(शिंदे गट)यांच्या तर्फे तुमसर येथील बावनकर चौकापासून इथून सुरू करून,जुना बस स्टॉप चौक ते पोलीस स्टेशन तुमसर समोरील शहीद स्मारक पर्यंत भव्य ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व महायुती च्या नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या तर्फे तीनही भारतीय सैन्य दलातील जवानांचे कौतुक करत त्यांची जयजयकार करून भारत माता की जय उद्घोषणा देत जल्लोष करण्यात आलेे. याप्रसंगी आपले यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे सुध्दा अभिनंदन करण्यात आले.यावेळी तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजि.प्रदिप पडोळे, आमदार राजु कारेमोरे, माजी खा. मधुकर कुकडे,महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ.गीता कोंडेवार,जिल्हा महामंत्री सौ.कुंदा वैद्य,तुमसर शहर अध्यक्ष अमरीश सानेकर,तूमसर ग्रामीण खापा मंडळ अध्यक्ष संतोष वहिले,सिहोरा मंडळ अध्यक्ष डॉ. मनोज पटले,महिला मोर्चा अध्यक्ष सौ.प्रीती मलेवार, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मिश्रा, आशिष कुकडे,मुन्ना पुंडे,माजी नगरसेवक रजनीश लांजेवार, सचिन बोपचे, पंकज बालपांडे,सुनील पारधी, सौ.अर्चना भुरे,सौ.शीला डोये, सुनील लांजेवार,राजू गायधने, शोभा लांजेवार,अन्नू रोचवणी,महिला ग्रामीण अध्यक्ष सौ.प्रिंयका कटरे,राजकुमार मरठे,धनेद्र तुरकर,डॉ चंद्रशेखर भोयर, शैलेश मेश्राम, कृष्णा पाटील,,अनुज मलेवार, स्वप्नील मनगटे,शेखर मलेवार,अभय धुर्वे,सतीश मलेवार, संदीप कटकवार, ललित शुक्ला,सुशील मेश्राम, निषिथ वर्मा,गजानन निनावे,गोवर्धन शेंडे,अरविंद पटले, राजु भगत, डॉ.पारधी, सौ.सुशीला पटले,सौ.पल्लवी पाटील,सौ.मनीषा उपाध्याय, सौ.ज्योती मिश्रा,सौ.ममता गजभिये,सौ.उर्मिला राजगिरे,सौ.शोभा सहारे,सौ. मीनाक्षी मेश्राम, सौ.सीमा देशमुख, सौ.प्रभा पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार)गटाचे देवचंदजी ठाकरे,यासिन छवारे,सुमित लोखंडे, शिवसेना(शिंदे गट)चे किशोरजी चौधरी, यांच्यासह महायुती चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.






