

प्रफुल्ल पटेल व राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी, चिचगड, ककोडी येथे आढावा सभा संपन्न; जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांचे मार्गदर्शन
देवरी : देवरी, चिचगड आणि ककोडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा आयोजित दि.१६ मे रोजी करण्यात आली. ही सभा देवरी तालुक्याचे पक्ष प्रवेक्षक व जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती मा. सुरेश हर्षे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मा. प्रफुल्लभाई पटेल व मा. राजेंद्र जैन (माजी आमदार) यांच्या आदेशानुसार तालुक्यातील प्रत्येक बुथस्तरावर सभासद नोंदणी अधिकाधिक होण्यासाठी निर्देश देण्यात आले. बुथ प्रमुखांनी प्रत्येक समाजात, घटकात जाऊन सभासद नोंदणी अभियान यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले. बुथ मजबूत तर पक्ष मजबूत, या संकल्पनेवर भर देण्यात आला.
सभेत सांगण्यात आले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती, सेवा सहकारी संस्था यासारख्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला बल देण्यासाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे. पक्ष बळकटीकरणासाठी बुथ प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले.
प्रफुल्ल पटेल व राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात काम करताना त्यांची कार्यकर्त्यांप्रती असलेली तत्परता व पक्षातील स्थान सर्वसामान्यांना लाभदायक ठरते, असे वक्तव्य करण्यात आले. जनतेच्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या आढावा सभेस उपस्थित मान्यवर –मा. सि. के. बिसेन – तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस,मा. जियालाल भाऊ पंधरे,मा. पंकज शहारे – नगरसेवक, महिला तालुका अध्यक्षा,गोपाल तिवारी,भैय्यालाल चांदेकर,सुजित अग्रवाल – युवक अध्यक्ष,मा. नेहमीचंद,मा. दुरुगकर,मनोजसिंह बैस,राजेश बिजलेकर,बबलूभाई पठाण,मकसुत शेख,मग बुल शेख,रोशन परिहार,अमरदास सोनबोईर,सचिन अग्रवाल,मनिस मोठे,गुरमीत सिंग भाटीया,द्वारका प्रसाद सोनबोईर,सागर बैस,गुंजन भाटीया,शत्रुघ्न झपारपार,चंद्रपूर शहारे,विजय भांडारकर,प्रमोद मेंढे या बैठकीस इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, महिला कार्यकर्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षवेधी ठरली.
या बैठकीतून देवरी तालुक्यातील संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळाले असून, येत्या काळात पक्ष अधिक सक्षमपणे स्थानिक निवडणुकांना सामोरे जाणार आहे.






