आदिवासी बहुल क्षेत्रातील समस्या सोडवा; भाजप जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे यांचे आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन

0
451
1

प्रतिनिधी/ सतीश पटले

भंडारा जिल्ह्यातील बहुतांश दुर्गम भागात आदिवासी समाज वास्तव्य करीत असून आदिवासी समाज व आदिवासी दुर्गम भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासंदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे यांनी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना निवेदन दिले. निवेदनातून भंडारा जिल्ह्यातील वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या अनु- जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006 व नियम 2008 व सुधारित नियम 2012 च्या नियमानुसार तात्काळ अमलबजावणी करून वन हक्क पट्टे वाटप करण्यात यावे, तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील 12 गावे शेती सिंचनापासून व पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत त्या बाराही गावांना बावनथडी प्रकल्पाद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करावी, तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील 22 गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत गर्रा बघेडा फिल्टर प्लांट या नावाने पाणीपुरवठा योजना सुरू केली होती मात्र त्या गावांना पाणीपुरवठा होत नाही, दरम्यान त्या 22 गावांसाठी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, तुमसर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गारकाभोंगा, कारली, आसलपाणी, मोठागाव या गावातील जमिनीत मॅगनीज उपलब्ध असून या गावात मॅगनीज खदान सुरू करावे. यामुळे क्षेत्रातील नागरिकांना रोजगार देता येईल. अशा मागणीचे निवेदन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी खा. मधुकर कुकडे, भाजपचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रप्रमुख इंजि. प्रदीप पडोळे, माजी जि.प. सदस्य तथा आदिवासी सेवक अशोक उईके, माजी भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, आनंदकिशोर जयस्वाल उपस्थित होते.