

रब्बी हंगाम २०२५ साठी बनगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू; सभापती केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम पार पडला
आमगांव : कृषी उत्पन्न बाजार समिती, आमगाव येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र, बनगावच्या रब्बी पणन हंगाम २०२५ अंतर्गत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन मंगळवारला दि २० मे रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव मानकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती राजेश भक्तवर्ती उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमास समितीचे संचालक टीकाराम मेंढे, अनिल शर्मा, संजय बाहेकर, महेश उके, उत्तम नंदेश्वर, सोमेश असाटी, गणेश हर्षे, हुकुम बोहरे, संजय नागपूरे, युवराज बिसेन,भुपेश अग्रवाल तसेच संचालिका सौ. चिंतनबाई तुरकर व सौ. शशिकला दोनोडे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संचालन व समन्वय सचिव गजानन चुटे यांनी केले. बाजार समितीचे कर्मचारी राहुल साखरे, मधु पारवे, अतीत बिसेन, वैभव मेश्राम, दिनेश सराटे, लालबहादूर चव्हाण, अशोक पाथोडे, रणजीत रामटेके तसेच बाजार समितीतील सर्व हमाल बांधवही या प्रसंगी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आधारभूत दराने धान विक्रीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या केंद्रामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.




रब्बी हंगाम २०२५ साठी बनगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू; सभापती केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम पार पडला

