जनता सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक गिरधारी शिवणकर यांचे निधन – पदमपुर गावात शोककळा

0
268
1

शून्यातून विश्व निर्माण करणारे एक कर्तबगार, सज्जन व समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले

 आमगाव : जनता सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक आणि सामाजिक भान जपणारे गिरधारी शिवणकर (वय – ७८ वर्षे) यांचे आज दिनांक २१ मे २०२५ बुधवारला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पदमपुर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

गिरधारी शिवणकर हे त्यांच्या प्रामाणिकतेसाठी, कर्तव्यनिष्ठेकरिता आणि सहृदय स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी दीर्घकाळ बँकिंग क्षेत्रात सेवा बजावली असून, गरजू नागरिकांना मार्गदर्शन करत आर्थिक साक्षरतेचा वसा पसरविला. त्यांच्या नेतृत्वामुळे जनता सहकारी बँकेचा विश्वास लोकांमध्ये दृढ झाला.

ते केवळ बँक अधिकारी नव्हते, तर समाजहिताचे कार्य हाच त्यांचा खरा ध्यास होता. स्थानिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘शून्यातून विश्व निर्माण करणारे’ गिरधारी भाऊ हे एक प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनामुळे पदमपुरने एक सच्चा मार्गदर्शक, सल्लागार व सज्जन व्यक्ती गमावली आहे.

त्यांच्यावर अंतिम संस्कार आज दुपारी 1.00 वाजता स्थानिक मोक्षधाम, पदमपुर येथे करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली आणि आप्तस्वकीय असा परिवार आहे.

न्यूजप्रभात मीडिया तर्फे विनम्र श्रद्धांजली।

 

Previous articleउद्या आमगाव सबस्टेशनवरील विद्युत पुरवठा खंडित राहणार – ग्राहकांनी नोंद घ्यावी
Next articleअहेरी राजनगरीतील मूख्य रस्ता चमकणार की काय ?