

महात्मा गांधी चौकात महात्मा गांधी विचार मंचच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम; जिल्हा काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती
आमगाव – भारतरत्न, माजी पंतप्रधान व विज्ञान-तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमगाव येथील महात्मा गांधी चौकात महात्मा गांधी विचार मंचच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव रामसिंह चौहान होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व राजीव गांधी यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्व. राजीव गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमात गोंदिया जिल्हा काँग्रेसचे सचिव इसुलाल भालेकर, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी संपतलाल सोनी, तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय बहेकार, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष बाबा मिश्रा, नगर काँग्रेस अध्यक्ष देवकांत बहेकार, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. छबुताई उके, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा सौ. प्रभादेवी उपराडे, तालुका काँग्रेस प्रवक्ते सिद्धेंद्र ठाकूर, तसेच यादवराव भोयर, गणेश रामटेके, प्रशांत गायधने, महेश उके, यावकराम उपराडे, पेंटर पिरखां, रामेश्वर शामकुवर, पिंकेश शेंडे, रवि रहांगडाले, अनिल आईंद्रेवार, भोला गुप्ता, उपासराव शेंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रितेश चुटे यांनी केले तर आभारप्रदर्शन राहुल चुटे यांनी मानले.
राजीव गांधी यांची दूरदृष्टी, आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान आणि युवकांसाठी दिलेले तंत्रज्ञानाधारित स्वप्न याची आठवण यावेळी उपस्थितांनी करून दिली.






